शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

दोन ऑलिम्पिकपटूंचा जयपूरमध्ये सामना, क्रीडामंत्र्यांविरुद्ध शेतकऱ्याची कन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 07:46 IST

भाजपला काँग्रेसचे आव्हान; राज्यवर्धन राठोड विरुद्ध कृष्णा पुनिया

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (ग्रामीण) मतदारसंघातून काँग्रेसने आलिम्पिकपटू कृष्णा पुनिया यांना उमेदवारी दिली असून, त्यांचा सामना दुसरे आॅलिम्पिकपटू राज्यवर्धन राठोड यांच्याशी होणार आहे. राज्यवर्धन राठोड हे मोदी सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री आहेत, तर कृष्णा पुनिया या काँग्रेसच्या आमदार आहेत.

राज्यवर्धन यांनी २00४ च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये दुहेरी टॅम्प सूटिंगमध्ये रौप्यपदक मिळवले होते, तर कृष्णा पुनिया २0१२ साली लंडनच्या आॅलिम्पिकमध्ये थाळीफेक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर होत्या. राठोड यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच जागतिक नेमबाजी स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक पटकावले होते. या मतदारसंघातून राठोड यांचे नाव ठरलेच होते. कृष्णा पुनिया यांच्या नावाची घोषणा मात्र काँग्रेसने सोमवारी रात्री उशिरा केली. नाव जाहीर होईपर्यंत त्यांना आपण निवडणूक लढवणार असल्याचे माहीतच नव्हते. या दोघांनी २0१३ सालीच राजकारणात प्रवेश केला. राठोड भाजपमध्ये गेले, तर पुनिया काँग्रेसमध्ये. त्यांनी २0१३ साली विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्या पराभूत झाल्या. राठोड मात्र २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. पराभूत झालेल्या कृष्णा पुनिया नंतरही काँग्रेसमध्ये सक्रिय राहिल्या आणि त्या नुकत्याच राजस्थानात झालेल्या निवडणुकीत त्या सादुलपूरमधून विजयी झाल्या. (वृत्तसंस्था)मी शेतकऱ्याची मुलगीउमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृष्णा पुनिया म्हणाल्या की, मी साध्या गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे. मला ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या माहीत आहेत. मी कोणत्याही एअर कंडिशन्ड हॉलमध्ये बसून पदक पटकावलेले नाही. राज्यवर्धन राठोड हे गरीब व शेतकऱ्यांचे नव्हे, तर श्रीमंतांचे प्रतिनिधी आहेत.

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूक