ट्रकच्या धडकेत दोन मोटरसायकलस्वार ठार पुणे-हैद्राबाद रोडवरील घटना : मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:54+5:302015-09-02T23:31:54+5:30

सोलापूर : मार्केट यार्डाहून मुळेगावकडे जात असताना स्वाद हॉटेलसमोर पाठीमागून येणार्‍या मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1.15 वा. घडली. या प्रकरणी मालट्रक चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Two motorcycle-borne killed in truck accident in Pune-Hyderabad incident: Crime against the truck driver | ट्रकच्या धडकेत दोन मोटरसायकलस्वार ठार पुणे-हैद्राबाद रोडवरील घटना : मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

ट्रकच्या धडकेत दोन मोटरसायकलस्वार ठार पुणे-हैद्राबाद रोडवरील घटना : मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

लापूर : मार्केट यार्डाहून मुळेगावकडे जात असताना स्वाद हॉटेलसमोर पाठीमागून येणार्‍या मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1.15 वा. घडली. या प्रकरणी मालट्रक चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुसा शेख (वय 47), रमजान बागवान (दोघे रा. मुळेगाव रोड, सरवदे नगर सोलापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघे मोटरसायकल (क्र.एम.एच.13 एफ.4258) वरून मार्केट यार्ड येथून मुळेगाव रोडवरील सरवदे नगर येथील राहत्या घरी जात होते. मोटरसायकल हॉटेल स्वादसमोर आली असता पाठीमागून येणार्‍या मालट्रक (क्र.एम.एच.19 जे.963) ने जोरात धडक दिली. हा मालट्रक मांस घेऊन जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी अमीर मुसा शेख (वय 22, रा. मुळेगाव रोड सरवदे नगर) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सपोनि पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two motorcycle-borne killed in truck accident in Pune-Hyderabad incident: Crime against the truck driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.