छोटा राजनविरुद्ध आणखी दोन गुन्हे
By Admin | Updated: March 28, 2016 00:54 IST2016-03-28T00:54:40+5:302016-03-28T00:54:40+5:30
महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल केले. आपल्या

छोटा राजनविरुद्ध आणखी दोन गुन्हे
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल केले. आपल्या संशयित विरोधकाची हत्या आणि मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या संदर्भात हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा मुंबईच्या भेंडी बाजार येथील गोळीबाराशी संबंधित आहे. दुसरा गुन्हा मुंबईतील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल आहे. हे हल्लेखोर राजननेच पाठविल्याचा संशय आहे. (वृत्तसंस्था)