लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होत असून, हिंद एअर व फ्लाईएक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून एनओसी मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या लवकरच प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशस्थित शंख एअरलाही एनओसी देण्यात आली आहे.
सध्या कार्यरत विमान कंपन्या
एअर इंडिया I एअर इंडिया एक्स्प्रेस I इंडिगो I अलायन्स एअर (सार्वजनिक क्षेत्र) I अकासा एअर I स्पाइसजेट I स्टार एअर I फ्लाई९१ I इंडियावन एअर९०%+ इंडिगो व एअर इंडिया समूहाचा वाटा
‘उडान’ योजनेमुळे स्टार एअर, इंडिया वन एअर, फ्लाई९१ यांसारख्या छोट्या विमान कंपन्यांना प्रादेशिक हवाई संपर्क मजबूत करण्यात महत्त्वाचीभूमिका बजावता आली आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची क्षमता आहे.- के.राममोहन नायडू, नागरी हवाई वाहतूकमंत्री
प्रवाशांसाठी फायदेशीर देशांतर्गत विमान प्रवास क्षेत्रात सध्या इंडिगो, एअर इंडिया समूह या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. यांचा मिळून ९० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. अशा परिस्थितीत नव्या कंपन्यांचा प्रवेश स्पर्धा वाढवणारा आणि प्रवाशांसाठी फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे.
अधिक कंपन्यांना चालना भारतात अधिक विमान कंपन्या कार्यरत व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात नऊ विमान कंपन्या नियमित देशांतर्गतसेवा देत आहेत.
Web Summary : Hind Air and Flyxpres secure government NOC, poised to launch domestic flights. This increases competition in a market dominated by IndiGo and Air India, potentially benefiting passengers. The government encourages more airlines.
Web Summary : हिंद एयर और फ्लाईएक्सप्रेस को सरकार से एनओसी मिली, घरेलू उड़ानें शुरू करने के लिए तैयार। इंडिगो और एयर इंडिया के प्रभुत्व वाले बाजार में प्रतिस्पर्धा बढ़ेगी, जिससे यात्रियों को लाभ हो सकता है। सरकार अधिक एयरलाइनों को प्रोत्साहित करती है।