दोन महिन्यांनंतर दिसले फारुख अब्दुल्ला, घेतल्या नेत्यांच्या भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:48 PM2019-10-06T17:48:08+5:302019-10-06T17:49:00+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरूच आहे.

Two months later, Farooq Abdullah appeared to meet the leaders | दोन महिन्यांनंतर दिसले फारुख अब्दुल्ला, घेतल्या नेत्यांच्या भेटीगाठी

दोन महिन्यांनंतर दिसले फारुख अब्दुल्ला, घेतल्या नेत्यांच्या भेटीगाठी

Next

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरूच आहे. श्रीनगरमध्ये नजरकैदेत असलेले माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लांशी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आज भेटीगाठी घेतल्या आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अब्दुल्ला कुटुंबीयांना नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास मंजुरी दिलेली आहे.

फारुख आणि ओमर अब्दुल्लांना 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनानं नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांना पार्टी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्लांना भेटण्यास परवानगी दिली होती. कलम 370 हटवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्लाला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. 

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फ्ररन्सच्या खासदारांना फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, भेट झाल्यानंतर निर्बंधामुळे खासदारांना मीडियासोबत बातचीत करता आलेली नाही. 

Web Title: Two months later, Farooq Abdullah appeared to meet the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.