मोबाईल वापरण्यास मनाई केल्याने दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या
By Admin | Updated: September 13, 2014 14:18 IST2014-09-13T14:17:52+5:302014-09-13T14:18:05+5:30
वसतिगृह अधिक्षक व पालकांनी मोबाईल वापरण्यास मनाई केल्यामुळे त्रिपुरामध्ये दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोबाईल वापरण्यास मनाई केल्याने दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
आगरताळा, दि. १३ - वसतिगृह अधिक्षक व पालकांनी मोबाईल वापरण्यास मनाई केल्यामुळे त्रिपुरामध्ये दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
त्रिपुरातील ताकरजाळा शाळेत इयत्ता दहावीत शिकणा-या तीन मुलींना वसतिगृहात चोरून मोबाईल वापरल्याप्रकरणी ओरडा खावा लागला होता. वसतिगृह प्रमुख व मुलींच्या पालकांनी त्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर त्या तिघीही गुरूवारी हॉस्टेलमधून बाहेर पडल्या आणि त्यातील दोघींनी शाळेजवळील परिसरात आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी पोलिसांनी त्या दोघींचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.