काश्मीरमध्ये चकमकीत 2 जवान शहिद, 1 दहशतवादी ठार
By Admin | Updated: August 8, 2016 12:23 IST2016-08-08T12:23:28+5:302016-08-08T12:23:28+5:30
कुपवारा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन बीएसएफ जवान शहीद झाले आहेत

काश्मीरमध्ये चकमकीत 2 जवान शहिद, 1 दहशतवादी ठार
>ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 8 - कुपवारा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन बीएसएफ जवान शहीद झाले आहेत. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. बीएसफ आण दहशतवाद्यांमधील चकमक अजूनही सुरु आहे. दरम्यान काश्मीरमधील जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. सलग 31 व्या दिवशी कर्फ्यू सुरु असून शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप, खासगी कार्यलयांसह महत्वाची ठिकाणे बंद आहेत.