दोन दहशतवाद्याचा खात्मा, एसएलआर आणि एके-47 जप्त

By Admin | Updated: March 26, 2017 17:59 IST2017-03-26T17:59:47+5:302017-03-26T17:59:47+5:30

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पोलिसांच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला केला. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे.

Two militants killed, SLR and AK-47 seized | दोन दहशतवाद्याचा खात्मा, एसएलआर आणि एके-47 जप्त

दोन दहशतवाद्याचा खात्मा, एसएलआर आणि एके-47 जप्त

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पोलिसांच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला केला. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एसएलआर आणि एक एके-47 जप्त करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन कऱण्यासाठी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमानापुर्वी दहशतवादी हल्ला झाल्यामुळे सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात हा दुसरा हल्ला आहे.

आज दुपारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला चढवला. दहशतावाद्याच्या हल्लाला भारतीय पोलिसांनी चोख उत्तर देताना त्यांना यमसदनी पाठवले. त्यानंतर पुलावाच्या संपूर्ण परिसराला सुरक्षा यंत्रणानी वेढा घातला असून अद्याप परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा आणि अवंतीपोरामधील पोलीस अधीक्षक रईस अहमद, झाहीद मलिक तसेच जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंदन कोहली हे तिघे जण गस्तीपथकासोबत जात होते. यादरम्यान गाडीने आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही तात्काळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र ताब्यात घेतली असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Two militants killed, SLR and AK-47 seized