पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

By Admin | Updated: March 9, 2016 19:50 IST2016-03-09T19:48:28+5:302016-03-09T19:50:59+5:30

अवंतिपोरा येथील वांडाखपोरा गावात झालेल्या चकमकीत लष्करी जवानांनी बुधवारी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

Two militants killed in Pulwama encounter | पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ९ - दक्षिणकाश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा येथील वांडाखपोरा गावात झालेल्या चकमकीत लष्करी जवानांनी बुधवारी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मागच्यावर्षी उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावर हल्ल्याच्या कट रचणारा मुख्य सूत्रधार या चकमकीत ठार झाला आहे. 
लष्कर-ए-तोएबचा कमांडर आणि उधमपूर हल्ल्याचा सूत्रधार अबू उकाशा आणि एक दहशतवादी या चकमकीत ठार झाला. पूचाल भागात शोधमोहिम सुरु असताना गोरीपोरा गावातून  गोळीबाराचा आवाज आला अशी माहिती पोलिस अधिका-याने दिली. 
अतिरिक्त कुमक तात्काळ गोरीपोरा गावात दाखल झाली आणि अतिरेक्यांना पळता येऊ नये यासाठी गावाला वेढा घातला. अतिरेक्यांनी तिथून निसटण्यासाठी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. अजूनही काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून, अजूनही चकमक सुरु आहे. 

Web Title: Two militants killed in Pulwama encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.