पुलवामामध्ये जवानांबरोबर झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार
By Admin | Updated: December 31, 2015 11:33 IST2015-12-31T10:18:32+5:302015-12-31T11:33:06+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुसू गावामध्ये सुरक्षापथकाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

पुलवामामध्ये जवानांबरोबर झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार
ऑनलाइन लोकमत
पुलवामा, दि. ३१ - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुसू गावामध्ये सुरक्षापथकाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. बुधवारपासून सुरक्षापथकांची कारवाई सुरु होती.
गुसू गावातील एका घरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ५३ राष्ट्रीय रायफल्सचे जवान, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाने दहशतवादी लपलेल्या घराला घेराव घातला होता. सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक रात्री दीड वाजण्याच्या सुमारास संपली.
ठार झालेल्या दोघा दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचे नाव मंजूर भट आहे. काश्मीर खो-यात सक्रीय असलेल्या हिजबूल या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करतात असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन एके-४७ आणि शस्त्रसाठी जप्त केला.