दोन जीवंत हरीण पकडले
By Admin | Updated: April 5, 2016 22:02 IST2016-04-05T22:02:03+5:302016-04-05T22:02:03+5:30
जळगाव : तस्करीसाठी आणलेल्या दोन जीवंत हरीणासह संशयित सचिन काळू मोरे (वय ३६ रा.भिलाटी, बोदवड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पकडले. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन मोरेसह हरीण वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी हेडकॉन्स्टेबल उत्तमसिंग पाटील, संजय पाटील, दिलीप येवले, विजय पाटील, ईश्वर सोनवणे, योगेश पाटील, दीपक पाटील, मनोज दुसाने आदींचे पथक फरार आरोपीच्या शोधासाठी पाठविले असता मोरे याच्या घरात काही तरी वण्यप्राणी असल्याची माहिती मिळाल्यावरुन पथकाने त्याच्या घरी धाड टाकली असता दोन जीवंत हरीण आढळून आल्या. वनपाल व्ही.आर.उपासणी यांना बोलावून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

दोन जीवंत हरीण पकडले
ज गाव : तस्करीसाठी आणलेल्या दोन जीवंत हरीणासह संशयित सचिन काळू मोरे (वय ३६ रा.भिलाटी, बोदवड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पकडले. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन मोरेसह हरीण वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी हेडकॉन्स्टेबल उत्तमसिंग पाटील, संजय पाटील, दिलीप येवले, विजय पाटील, ईश्वर सोनवणे, योगेश पाटील, दीपक पाटील, मनोज दुसाने आदींचे पथक फरार आरोपीच्या शोधासाठी पाठविले असता मोरे याच्या घरात काही तरी वण्यप्राणी असल्याची माहिती मिळाल्यावरुन पथकाने त्याच्या घरी धाड टाकली असता दोन जीवंत हरीण आढळून आल्या. वनपाल व्ही.आर.उपासणी यांना बोलावून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.