शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन नेत्यांनी नाकारली भाजपची उमेदवारी; पक्ष कार्यकर्ते संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:36 IST

काँग्रेसचे दिवंगत नेते सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा यांना भाजपने कोलकात्यातील चौरंगी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. आपले नाव भाजपच्या यादीत पाहून त्यांना धक्काच बसल्या. 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न भाजप करीत असला, तरी तिथे अनेक मतदारसंघांत पक्षाला उमेदवारच मिळालेेले नाहीत. काही ठिकाणी तृणमूलमधून आलेल्यांना लगेच उमेदवारी दिल्याने भाजप नेते व कार्यकर्ते संतप्त आहेत, तर दोन राजकीय नेत्यांनी भाजपची उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा यांना भाजपने कोलकात्यातील चौरंगी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. आपले नाव भाजपच्या यादीत पाहून त्यांना धक्काच बसल्या. त्या म्हणाल्या की, माझा भाजपचा अजिबात संबंध नाही. मी भाजपतर्फे निवडणूक लढवणारही नाही. तसे सांगायला त्या पक्षाकडे जाणारही नाही. त्यांनीच नाव यादीत घातले, ते त्यांनीच काढावे.  दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आमदार माला साहा यांच्याऐवजी कोलकात्याच्या उपमहापौरांना उमेदवारी दिली. त्याबद्दल साहा यांची काहीच तक्रार नव्हती. पण त्या पक्षात नाराज असल्याचे गृहित धरून भाजपने त्यांचे पती तरुण साह यांच्या नावाची घोषणा केली. हे कळताच ते संतापले. ते म्हणाले की, सदस्य नसून भाजपने मला का उमेदवारी दिली, हे त्या पक्षाच्या नेत्यांना विचारा. मी तृणमूलच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे आणि करत राहीन. भाजपकडे राज्यात उमेदवार नाहीत, हे स्पष्ट आहे. 

गेल्या वर्षभरात तृणमूल, डावे व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी देतानाही त्यांचाच अधिक विचार झाला. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत व  संघ परिवारातील लोक नाराज आहेत. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्तेच उपाध्यक्ष खा. मुकुल रॉय, खा. अर्जुन सिंह, पक्ष सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या अंगावर धावून गेले, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा राग पाहून बड्या नेत्यांना पळ काढावा लागल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपा