दुचाकी-क्रुझ कार अपघातात दोन ठार

By Admin | Updated: November 6, 2016 01:32 IST2016-11-05T22:53:47+5:302016-11-06T01:32:01+5:30

त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृतीनजीक कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांपैकी एकजण जागीच ठार, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

Two killed in bike-cruise car accident | दुचाकी-क्रुझ कार अपघातात दोन ठार

दुचाकी-क्रुझ कार अपघातात दोन ठार

त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृतीनजीक कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांपैकी एकजण जागीच ठार, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
नाशिकहून येणारी कु्रझ कार (क्र. एमएच १२ एचएफ ६३६४) व बेलगाव ढगा येथून नाशिककडे जात असलेली होंडा ॲक्टिवा (क्र. एम एच १५ इडब्ल्यू ८७९३) ही दुचाकी वळण घेताना दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला तर दुचाकीवरील गोरख छबु पोटींदे (२७), रा. बेळगाव ढगा हे जागीच ठार झाले तर संजय शंकर सताळे (३५)यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणास्तव गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Two killed in bike-cruise car accident