पाच अपघातात दोन ठार, सहा जखमी
By Admin | Updated: January 2, 2016 08:31 IST2016-01-02T08:31:04+5:302016-01-02T08:31:04+5:30
मुख्य पान १ साठी

पाच अपघातात दोन ठार, सहा जखमी
म ख्य पान १ साठीजळगाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्ात पाच अपघात झाले त्यात दोनजण ठार झाले तर सहाजण जखमी झाले आहेत.आसोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना विहिरीत पडून यशवंत दगडू ढाके (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ढाके हे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी होते. तर दुसर्या घटनेत वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सलीम सरदार तडवी (मुळ रा.बांबरुड राणीचे ह.मु.वाडीशेवाळे ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र युनूस तडवी (वय १८, रा.वाडीशेवाळे) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वाडीशेवाळे-खडकदेवळा रस्त्यावर झाला आणि तिसर्या अपघातात मनोज नारायण तासकर (वय ३९, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) या दुचाकीस्वाराला महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. संध्याकाळी महामार्गावर रिक्षाचा कट लागल्याने संदीप सुनील वेडीस्कर (वय २२) व विनय संजय उपाध्याय (वय २४, दोन्ही रा.जळगाव) हे जखमी झाले. संदीपला जबर मार बसल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. धानोरा खुर्द ता.जळगाव येथे शेतात रस्त्यावर उभा असलेल्या गणेश शालीक पाटील (वय १३) या बालकाला दुचाकीस्वाराने उडविल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वार विकास महारु अहिरे हादेखील जखमी झाला आहे.