दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान जखमी
By Admin | Updated: December 29, 2016 09:16 IST2016-12-29T09:13:50+5:302016-12-29T09:16:45+5:30
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन गावामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई दरम्यान लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान जखमी
ऑनलाइन लोकमत
बांदीपोरा, दि. 29 - जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन गावामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई दरम्यान लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. काही दहशतवादी या गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवार सकाळपासून इथे कारवाई सुरु आहे.
लष्कराच्या जवानांनी दहशतवादी लपलेल्या भागाला घेराव घातला आहे. घेराबंदी केल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यात दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे.