काश्मीरमध्ये चकमक, कॅप्टनसह दोन जवान शहीद
By Admin | Updated: February 21, 2016 12:35 IST2016-02-21T09:48:41+5:302016-02-21T12:35:28+5:30
पम्पोर जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनसह सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.

काश्मीरमध्ये चकमक, कॅप्टनसह दोन जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २१ - जम्मू-काश्मीरच्या पम्पोर जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनसह सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. एका नागरीकाचाही या चकमकीत मृत्यू झाला आहे.
शनिवारी संध्याकाळी सुरु झालेली ही चकमक अद्यापही सुरु आहे. दहशतवादी एका इमारतीत दबा धरून बसले आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जाणा-या सीआरपीएफच्या बसवर आधी अतिरेक्यांनी हल्ला केला त्यानंतर जवळच्या प्रशिक्षण इमारतीत घुसले.
अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात बसमध्ये असणारे सीआरपीएफचे ११ जवान जखमी झाले. हल्ला केल्यानंतर हे अतिरेकी महामार्गावरील जवळच्या प्रशिक्षण इमारतीत घुसले. त्यावेळी इमारतीत १५० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी होते अशी माहिती अधिका-यांनी दिली.
इमारतीत तीन अतिरेकी घुसल्याची शक्यता असून, सुरक्षापथकांनी अतिरेक्यांशी दोन हात करताना सर्वप्रथम इमारतीतील नागरीकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केले आहे.