अर्ध्या तासात दोन जबरी चोऱ्या
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:22+5:302015-07-31T23:03:22+5:30
नागपूर : केवळ अर्ध्या तासात लुटारूंनी दोन चेनस्नॅचिंग करून महिलांचे ७० हजारांचे दागिने लंपास केले. शुक्रवारी सकाळी ८.३० ते ९ या वेळेत अंबाझरी आणि प्रतापनगरात या घटना घडल्या.

अर्ध्या तासात दोन जबरी चोऱ्या
न गपूर : केवळ अर्ध्या तासात लुटारूंनी दोन चेनस्नॅचिंग करून महिलांचे ७० हजारांचे दागिने लंपास केले. शुक्रवारी सकाळी ८.३० ते ९ या वेळेत अंबाझरी आणि प्रतापनगरात या घटना घडल्या. शुक्रवारी सकाळी ८. ३० च्या सुमारास व्यंकटेशनगर, खामला येथील रहिवासी स्वाती श्रीकांत मोरे (वय ५२) या आपल्या ॲक्टीव्हाने कॅफे हाऊस चौकाकडून लॉ कॉलेज चौकाकडे जात होत्या. लोटस् बिल्डींगसमोर दुचाकीवरून आलेल्या एका लुटारूने मोरे यांच्या गळ्यातील २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या घटनेच्या अर्धा तासानंतर शंभुकर अपार्टमेंट, नवीन स्नेहनगर येथील रहिवासी श्रीलक्ष्मी अकेला ब्रह्ममूर्ती (वय ४३) यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र मोटरसायकलवरील दोन लुटारूंनी हिसकावून नेले. श्रीलक्ष्मी ब्रह्ममूर्ती या दर्शनासाठी साई मंदिरात पायी जात असताना ही घटना घडली. या दोन्ही प्रकरणात पीडित महिलांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून अनुक्रमे अंबाझरी आणि प्रतापनगर पोलिसांनी लुटारुविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा नोंदविला. ---