बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी
By Admin | Updated: October 17, 2016 02:26 IST2016-10-17T02:26:49+5:302016-10-17T02:26:49+5:30
लोणार तालुक्यातील घटना.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी
लोणार, दि. १६- लोणार येथून दुचाकीने देऊळगाव कुंडपाळ जाणार्या संतोष कैलास सरकटे (३३) व गणेश भास्कर गाढवे (४0) यांच्यावर रविवारी रात्री ९ वाजून ३0 मिनिटांनी लोणार सरोवर परिसरातील गणपती मंदिराजवळ बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनाही स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.