क्रेन घरावर पडल्याने दोघे जखमी

By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:20+5:302015-09-06T23:09:20+5:30

सोलापूर : क्रेनचा एक भाग तुटून घरावर पडल्याने दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता सात रस्ता भागातील शिवाजी नगरात घडली. अंबुबाई अनिल आलमेलकर (वय 35, रा. मोदीखाना, सोलापूर) आणि विष्णू प्रकाश शिंदे (वय 31, रा. उळेगाव, ता. उत्तर सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.

Two injured in crane collapses | क्रेन घरावर पडल्याने दोघे जखमी

क्रेन घरावर पडल्याने दोघे जखमी

लापूर : क्रेनचा एक भाग तुटून घरावर पडल्याने दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता सात रस्ता भागातील शिवाजी नगरात घडली. अंबुबाई अनिल आलमेलकर (वय 35, रा. मोदीखाना, सोलापूर) आणि विष्णू प्रकाश शिंदे (वय 31, रा. उळेगाव, ता. उत्तर सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
शिवाजी नगरात म्हाडाचे बांधकाम सुरु होते. या बांधकामासाठी मागवण्यात आलेल्या क्रेनचा एक भाग तुटल्याने तो एका घरावर आदळला. क्रेनचा लोखंडी हूक डोक्याला लागल्याने दोघे जखमी झाले. सागर वाघमारे याने जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two injured in crane collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.