पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद

By Admin | Updated: July 12, 2017 17:21 IST2017-07-12T16:58:09+5:302017-07-12T17:21:26+5:30

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

Two Indian soldiers martyred in Pakistani firing | पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद

ऑनलाइन लोकमत
जम्मू -काश्मीर, दि. 12 - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत. गुरुवारी पाकिस्ताने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये असलेल्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराचे जवान सुद्धा जशास तसे चोख प्रत्युत्तर देत आहे. 
याआधी 8 जुलै रोजी जम्मू -काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला होता. तसेच, त्याच्या पत्नीचाही यामध्ये मृत्यू झाला होता.   

गेल्या सोमवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने 7 भाविकांचा मृत्यू झाला. तर तीन पोलिसांसह 32 भाविक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

त्याचबरोबर, दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक झाली होती. यावेळी नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

Web Title: Two Indian soldiers martyred in Pakistani firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.