शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची आगळीक, नियंत्रण रेषेवरील गोळीबारात दोन जवान शहीद, चार नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 08:54 IST

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत.

ठळक मुद्देशुक्रवारी पाकिस्तानने बारामुल्ला जिल्ह्यातील उरी विभागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबारास सुरुवात केलीपाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात चार जवान जखमी झाले. यापैकी दोन जवानांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालापाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे

श्रीनगर - एकीकडे देशात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असताना दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील रामपूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी पाकिस्तानने बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर विभागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबारास सुरुवात केली होती. दरम्यान, भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र यावेळी पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात चार जवान जखमी झाले. यापैकी दोन जवानांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या सैनिकांची ओळख पटली असून, यापैकी एका जवानाचे नाव हवालदार गोकर्ण सिंह तर दुसऱ्या जवानाचे नाव नायक शंकर एस.पी. आहे. तर हवालदार नारायण सिंह आणि नायक प्रदीप भट्ट यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने अकारण गोळीबारास सुरुवात केली. यादरम्यान काही जवान जखमी झाले.

यापूर्वी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले होते. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तान