टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित
By Admin | Updated: October 31, 2014 12:39 IST2014-10-31T12:16:41+5:302014-10-31T12:39:55+5:30
टू-जी घोटाळाप्रकरणी विशेष न्यायलयाने शुक्रवारी ए.राज, कणिमोळी यांच्यासह १९ जणांविरोधात आरोप निश्चित केले.

टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - टू-जी घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी दूरसंचारमंत्री ए.राजा, कणिमोळी यांच्यासह १९ जणांविरोधात आरोप निश्चित केले. पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सर्वांवर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने ए.राजा, कणिमोळी तसेच स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद बलवा, करीम मोरानी, करुणानिधी यांच्या पत्नी दयाळू अम्मा, विनोद गोएंका यांच्यासह एकूण १९ जणांवर आरोप निश्चित केले आहेत.
याप्रकरणी दिल्लीतील पटियाळा हाऊसमधील विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आपण निर्दोष असल्याचे सांगत याप्रकरणी सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी या सर्वांनी न्यायालयाकडे केली आहे.