काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By Admin | Updated: September 22, 2014 09:48 IST2014-09-22T05:05:18+5:302014-09-22T09:48:57+5:30

सानपाडा विभागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळाराम पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Two former Congress corporators of NCP have to enter the NCP | काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबई : सानपाडा विभागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळाराम पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाटील दाम्पत्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.
कोपरखैरणे येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही निधर्मी आणि विकासाची आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या लोककल्याणकारी नेतृत्वाखाली आम्ही यापुढे कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याप्रसंगी हरिश्चंद्र पाटील, रामचंद्र पाटील, नारायण पाटील, प्रविण उबाळे, अनिल चिलवंते, समित जाधव, वैभव घोलप आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Two former Congress corporators of NCP have to enter the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.