पाथर्डीत आढळले दोन स्त्री जातीचे अर्भक शहरात खळबळ, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:37+5:302014-12-20T22:27:37+5:30

पाथर्डी : शहरात शनिवारी दोन स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ येथील रावसाहेब म्हस्के कॉलनीमध्ये सकाळी एक अर्भक तर दुपारच्या सुमारास आरोग्य माता केेंद्र इमारतीच्या मागील बाजूला दुसरे अर्भक निदर्शनास आले़ शहरात एकाच दिवशी दोन स्त्री जातीचेअर्भक सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे़ अर्भकाचे मृतदेह पोलिसांनी उपजिल्हारूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत़

Two female marriages found in Pathardi in the infant city, filed an FIR against unknown person | पाथर्डीत आढळले दोन स्त्री जातीचे अर्भक शहरात खळबळ, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डीत आढळले दोन स्त्री जातीचे अर्भक शहरात खळबळ, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

थर्डी : शहरात शनिवारी दोन स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ येथील रावसाहेब म्हस्के कॉलनीमध्ये सकाळी एक अर्भक तर दुपारच्या सुमारास आरोग्य माता केेंद्र इमारतीच्या मागील बाजूला दुसरे अर्भक निदर्शनास आले़ शहरात एकाच दिवशी दोन स्त्री जातीचेअर्भक सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे़ अर्भकाचे मृतदेह पोलिसांनी उपजिल्हारूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत़
शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रावसाहेब म्हस्के कॉलनी परिसरात डुकरांनी ओढत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आणला. अर्भकाचा डोक्याचा भाग पूर्णपणे कुरतुडलेला होता. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली़ याबाबत अविनाश साहेबराव टकले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पहिल्या अर्भकाची चर्चा शहरात सुरू असताना नगर रस्त्यावरील आरोग्य माता केंद्राच्या मागील बाजूला मातीमध्ये अर्धवट झाकलेल्या अवस्थेतील एक अर्भक निदर्शनास आले़ सुमारे साडेसात महिने वाढ झालेले हे अर्भक मृत अवस्थेत आढळले.आरोग्य माता केंद्राच्या प्रमुख डॉ.एम.एम.करकरिया यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही घटनेबाबत कुणीतरी अज्ञात स्त्री ने अर्भक टाकून दिल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान शनिवारी दुपारी एक कुमारी माता आरोग्य माता केंद्रात आली होती़ तिची तपासणी केल्यानंतर तिला उपजिल्हारूग्णालयात जाण्यास सांगितले मात्र, नंतर ती गायब झाली तीने केंद्रातील अधिकार्‍यांना निवडुंगे येथील असल्याचे सांगितले परंतु तीने सांगितलेल्या नावाची कोणतीही व्यक्ती निवडुंगे येथे नाही .आरोग्य माता केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत त्याच्या आधारे पोलीस सदर महिलेचा शोध घेत आहेत़

Web Title: Two female marriages found in Pathardi in the infant city, filed an FIR against unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.