हरयाणात दोन एक्स्प्रेसची भीषण धडक, १ ठार तर १०० जखमी
By Admin | Updated: December 8, 2015 13:14 IST2015-12-08T11:15:52+5:302015-12-08T13:14:54+5:30
हरयाणात एक्सप्रेस ट्रेन व शटलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात १ ठार तर १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

हरयाणात दोन एक्स्प्रेसची भीषण धडक, १ ठार तर १०० जखमी
ऑनलाइन लोकमत
पलवल, दि. ८ - हरियाणात असावटी आणि पलवर दरम्यान एक्स्प्रेस व शटलची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात शटलचा चालक ठार झाला असून, १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी लोकमान्य टिळक एक्सप्रेसला मागून आलेल्या ईएमयू शटलने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, दोन्ही गाड्यांचे काही डबे रुळांवरुन घसरले असून त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताचे वृत्त कळताच रेल्वे व मदतपथकाचे घटनास्थळी झाले. जखमींना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.