दोन अपघातात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 15, 2015 00:27 IST2015-08-15T00:27:20+5:302015-08-15T00:27:20+5:30

नागपूर : भरधाव दुचाकीचालकाने कट मारल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या भिवसनखोरीतील तरुणाचा करुण अंत झाला. विजय रामकृष्ण उईके (वय ३४) असे मृताचे नाव आहे.

Two deaths in two accidents | दोन अपघातात दोघांचा मृत्यू

दोन अपघातात दोघांचा मृत्यू

गपूर : भरधाव दुचाकीचालकाने कट मारल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या भिवसनखोरीतील तरुणाचा करुण अंत झाला. विजय रामकृष्ण उईके (वय ३४) असे मृताचे नाव आहे.
भिवसनखोरीतच राहाणाऱ्या मित्राच्या दुचाकीवर बसून गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास विजय हजारी पहाड नाल्याजवळून जात होता. बाजूने वेगात आलेल्या दुचाकीचालकाने विजयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे खाली पडून विजय गंभीर जखमी झाला. त्याला मेयोत दाखल करण्यात आले. रात्री १२ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. श्रध्दा विजय उईके (वय २४) यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दुचाकी चालकाचा शोध घेतला जात आहे.
ॲक्टीव्हा घसरून तरुणाचा मृत्यू
ॲक्टीव्हा घसरून जबर जखमी झालेल्या रोहित देवीदास कंगाले (वय २५, रा. मासूरकर चौकाजवळ) याचा करुण अंत झाला. ६ ऑगस्टला सायंकाळी ५.३० या सुमारास कोतवाली हद्दीत गंगाबाई घाट समोरच्या रस्त्यावर अचानक ॲक्टीव्हा स्लीप झाल्यामुळे कंगाले खाली पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला रहाटे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे २ च्या सुमारास डॉक्टरांनी कंगालेला मृत घोषित केले. कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Two deaths in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.