झारखंडमध्ये कैद्यांची भागमभाग, पोलिसांच्या गोळीबारात २ ठार

By Admin | Updated: December 9, 2014 18:49 IST2014-12-09T18:36:51+5:302014-12-09T18:49:00+5:30

झारखंडमधील चाइबासा जिल्ह्यात न्यायालयातील सुनावणीनंतर तुरुंगात परतत असताना १८ कैद्यांनी पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

Two dead in police firing, part of jail in Jharkhand | झारखंडमध्ये कैद्यांची भागमभाग, पोलिसांच्या गोळीबारात २ ठार

झारखंडमध्ये कैद्यांची भागमभाग, पोलिसांच्या गोळीबारात २ ठार

ऑनलाइन लोकमत

चाइबासा (झारखंड), दि. ९ - झारखंडमधील चाइबासा जिल्ह्यात न्यायालयातील सुनावणीनंतर तुरुंगात परतत असताना १८ कैद्यांनी पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाला असून तीन कैदी जखमी झाले आहेत.   
चाइबासा जिल्ह्यातील तुरुंगातील १८ न्यायबंदींना मंगळवारी सकाळी सुनावणी न्यायालयात आणले होते. दुपारी सुनावणी झाल्यानंतर या सर्वांना पुन्हा तुरुंगात नेण्यात होते. यादरम्यान या १८ न्यायबंदींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी न्यायबंदीवर गोळीबार केला व यात दोन जण ठार झाले. तर तिघे जण जखमी झाले. उर्वरित १३ न्यायबंदी हे पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत. पळ काढलेल्यांपैकी काही न्यायबंदी हे नक्षलवादी कारवायांशी संबंधीत असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी झारखंड पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Two dead in police firing, part of jail in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.