बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:13+5:302015-01-23T23:06:13+5:30
बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन

बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन
ब द्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलनभदंत आनंद महाथेरोंची माहिती : बोधगया महाविहाराच्या मुक्तीबाबत होणार विचारमंथननागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यात असून हा विहार मुक्त करण्याच्या दृष्टीने भूमिका ठरविण्यासाठी लॉर्ड बुद्धा मैत्री संघ आणि वंदना संघ दीक्षाभूमीच्यावतीने दोन दिवसांचे अखिल भारतीय भिख्खु संमेलन २५ आणि २६ जानेवारीला आसोला येथील बुद्धनगरीच्या लॉर्ड बुद्धा परिसरात करण्यात आले आहे, अशी माहिती भदंत आनंद महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली. भदंत आनंद महाथेरो म्हणाले, बोधगया महाबोधी महाविहार कायद्याने हिंदूंच्या ताब्यात आहे. हे महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी मागील १८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन दिवसीय भिख्खु संमेलनात घर वापसी अभियान बौद्ध धम्मासह, अल्पसंख्यांक धर्मावर परिणाम करणारे आहे यावर तसेच मोदी सरकारच्या धर्म परिवर्तन विरोधी विधानाचा धर्म स्वातंत्र्यावर होणारा परिणाम, भारतीय बौद्धांची भूमिका यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी १९४९ च्या कायद्यात बदल करून नवा कायदा तयार करण्यासंदर्भात भूमिका ठरविण्यात येणार आहे. दोन दिवसीय भिख्खु संमेलनाचे उद्घाटन भिख्खु भदंत ज्ञानेश्वर कुशीनारा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भदंत आनंद महाथेरो उपस्थित राहणार आहेत. संमेलनात भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भदंत नरेंदा महाथेरो, भदंत आर्यपुत्र अंगुलीमाल महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, भदंत थेरोज्योती महाथेरो, शांतीस्वरूप बौद्ध, राजेंद्र गाणोरकर, भय्याजी खैरकर, देवीदास घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पत्रकार परिषदेला भदंत आनंद महाथेरो, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, प्रा. देवीदास घोडेस्वार, भय्याजी खैरकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)