शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनच्या कुरघोड्या सुरुच; चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सची भारतीय हद्दीत घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 10:34 IST

चिनी हेलिकॉप्टर्स जवळपास 10 मिनिटं भारतीय हद्दीत

नवी दिल्ली: चिनी हेलिकॉप्टर्सनं भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती समोर आली आहे. 27 सप्टेंबरला चीनच्या दोन  हेलिकॉप्टर्सनी लडाखमध्ये घुसखोरी केली होती. जवळपास 10 मिनिटं ही हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई हद्दीत होती. यानंतर ती चीनच्या दिशेनं परतली. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याआधी अनेकदा चीनच्या सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची दोन हेलिकॉप्टर्स 27 सप्टेंबरला लडाखच्या ट्रिग हाईट्स परिसरात घुसली होती. दोन्ही हेलिकॉप्टर्स 10 मिनिटं भारताच्या हवाई हद्दीत घिरट्या घालत होती. त्यानंतर ती पुन्हा चीनकडे रवाना झाली. याआधीही चीनची हेलिकॉप्टर्सनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मार्चमध्ये चारवेळा चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत आल्याचं गुप्तचर खात्याच्या अहवालातून समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशात चिनी लष्कराच्या जवावांनी घुसखोरी केली होती. चिनी लष्करानं सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. यानंतर भारतीय जवानांनी  विरोध दर्शवताच त्यांनी माघार घेतली. याच महिन्यात ही घटना घडली होती. याआधी मार्च महिन्यात उत्तराखंडमधील बाराहोती, ट्रिग हाईट्स आणि लडाखमधील देप्सांग खोऱ्यात चिनी जवानांनी घुसखोरी केली होती. तर ऑगस्टमध्ये चिनी सैनिकांनी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. 

टॅग्स :chinaचीनladakhलडाखIndiaभारत