बलात्कारप्रकरणी दोन मुलांना अटक
By Admin | Updated: October 18, 2015 22:20 IST2015-10-18T22:20:14+5:302015-10-18T22:20:14+5:30
पश्चिम दिल्लीत निहाल विहार भागात अडीच वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी रविवारी दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली. दोघेही १७ वर्षांचे व त्याच भागातील रहिवासी आहेत.

बलात्कारप्रकरणी दोन मुलांना अटक
नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीत निहाल विहार भागात अडीच वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी रविवारी दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली. दोघेही १७ वर्षांचे व त्याच भागातील रहिवासी आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १० मिनिटे वीज गेली होती त्याचा फायदा घेऊन त्यांनी या मुलीला पळविले. यानंतर दोघांपैकी एकाने चिमुकलीवर बलात्कार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दोघे कैद झाले होते, ते आरोपी नसल्याचे चौकशीअंती उघड झाले. त्या फुटेजमध्ये दोघे जण एका मुलीला मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याचे दिसले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी १५ पेक्षा अधिक पथके बनवली गेली होती. त्यांनी सुमारे २५० लोकांची चौकशी केली होती. यापैकी काही लोकांना वेगळे काढले गेले आणि त्यातूनच दोन अल्पवयीन आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले.
यापैकी एकाने चिमुकलीवर बलात्कार केला की, दोघांनीही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्या दिशेने चौकशी करीत आहेत.