शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अभिमानास्पद! शहीद जवान औरंगजेबचे दोन भाऊ भारतीय लष्करात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:19 PM

गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला जवान औरंगजेब याचे भारतीय लष्करात दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली - गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या औरंगजेब याचे दोन भाऊ मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही लष्करात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. गतवर्षी 14 जून रोजी ईदच्या सणासाठी घरी परतत असलेल्या औरंगजेबची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. 'आपला प्रदेश, देश वाचवण्यासाठी आणि भावाच्या हत्येचा बजला घेण्यासाठी आम्ही लष्करात दाखल झालो आहोत,' असे मोहम्मद शब्बीर याने प्रसारमाध्यमांना सांगितले. 

 'दहशतवाद्यांनी दगाफटका करून माझा मुलगा औरंगजेबची हत्या केली होती. जर त्याला लढताना वीरमरण आले असते तर मला त्याचे वाईट वाटले नसते. पण त्याला दगलबाजीने मारण्यात आले. मात्र आता माझे दोन्ही मुलगे लष्करात दाखल झाले आहेत, त्याचा मला अभिमान आहे. मात्र माझ्या मनात दु:खही आहे. त्यांनी माझ्या मुलाची हत्या केली त्यांच्याशी मी स्वत: लढावे, असे मला नेहमीच वाटते. मात्र आता माझे मुलगे औरंगजेबच्या हत्येचा बदला घेतील. तर औरंगजेबचा लहान भाऊ मोहम्मद तारिक म्हणाला की, 'जसे माझ्या भावाने देशासाठी बलिदान दिले, आपल्या रेजिमेंटचे नाव उंचावले. तसेच आम्हीही चांगले काम करू . भावा प्रमाणेच आम्हीही देशासाठी प्राण देण्यास मागेपुढे पाहणार नाही. माझ्या भावाच्या हत्येचा बदला घेण्याची माझी इच्छा आहे. मी माझे आणि पंजाब रेजिमेंटचे नाव उंचावेन.' 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर