शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कठुआ प्रकरण: जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 11:31 IST

जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

श्रीनगर- कठुआ प्रकरणी जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला. जम्मू-काश्मीर सरकारमधील या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून सडकून टीका झाली. इतकंच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही दोन नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचं समर्थन करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप या दोन मंत्र्यावर करण्यात आला आहे. 

जम्मू-काश्मीरमधील भाजपाचे प्रमुख सत शर्मा यांनी लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मू-काश्मीर सरकारमध्ये लाल सिंह वनमंत्री आहेत तर गंगा उद्योग आणि वाणिज्य विभागाचे मंत्री आहेत. कठुआ सामूहित बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया न दिल्याने काँग्रेससह सर्वसामान्यांकडून मोदींवर टीका झाली. गुरूवारी रात्री दिल्लीच्या इंडिया गेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॅण्डल मार्च काढण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाच्या उद्घाटन स्थळी बोलताना मोदींनी कठुआ-उनाव प्रकरणावर वक्तव्य केलं. 

देशभरातील कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये घडणाऱ्या अशा घटना मानवी संवेदनांना हादरविणाऱ्या आहेत. या दोन्ही घटनांमधील कुठलाही आरोपी सुटणार नाही, न्याय होणार आणि पूर्ण न्याय होणार, याचा विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. आपल्या समाजातील अंतर्गत वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून काम करावं लागेल, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरRapeबलात्कारCrimeगुन्हा