शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर बॉम्ब हल्ल्यात आसाम रायफल्सच्या दोन जवानांचा मृत्यू, सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 16:46 IST

मणिपूर- म्यानमार सीमेवरील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन आसाम रायफल्सच्या जवानांचा मृत्यू झाला

मणिपूर- म्यानमार सीमेवरील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन आसाम रायफल्सच्या जवानांचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी आहेत. सकाळी 6.20च्या सुमारास आसाम रायफल्स 18चे जवान दक्षिण इम्फाळमधल्या 65 किलोमीटर अंतरावरील महामणी गावातल्या रस्त्यावरून जात होते.त्याच वेळी दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानकपणे बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक जवान गंभीररीत्या जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. जखमी जवानांना लष्कराच्या लेइमखोंग या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. हा बॉम्ब रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आला होता. अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही.

तीन वर्षांपूर्वीसुद्धा मणिपूरची राजधानी इम्फाळच्या खोयाथोंग भागात शक्तिशाली आयईडी (इन्टेन्सिव्ह एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस)च्या स्फोटात तीन मजूर ठार आणि चार जखमी झाले होते. परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.आयईडीचा वापर केलेला हा बॉम्ब इम्फाळमधील बाजारपेठेजवळच्या रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता. परप्रांतातून मजुरीसाठी आलेले तिघे त्यात जागीच ठार झाले, तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकही मजूर मणिपुरी नाही. ते खोयाथोंग येथे एका दुकानात चहा घेण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. राज्यात या वर्षी बिगर मणिपुरी लोकांवर अनेकदा हल्ले झालेत आणि त्यात नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. 

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादी