वाटमारी करणाऱ्या दोघांना अटक

By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:39+5:302015-12-13T00:07:39+5:30

हिंगणा : वाटमारी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली. ही घटना मोंढा शिवारातील शक्ती प्रेस परिसरात शनिवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

The two arrested were arrested | वाटमारी करणाऱ्या दोघांना अटक

वाटमारी करणाऱ्या दोघांना अटक

ंगणा : वाटमारी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली. ही घटना मोंढा शिवारातील शक्ती प्रेस परिसरात शनिवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
कुणाल संतोष भरसागर (२५) व रवींद्र केशवराव अकोनेरकर (२०) दोन्ही रा. महाजनवाडी, वानाडोंगरी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. फिर्यादी सचिन अशोकराव इटनकर हे आपल्या एमएच-४०/एफ-७९१७ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणा येथून बोरगाव येथे ड्युटीवर जात होते. दरम्यान, मोंढा शिवारातील शक्ती प्रेसजवळ एमएच-४०/टी-४१५३ क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन्ही आरोपींनी फिर्यादीची दुचाकी अडवून त्यांना मारहाण करीत बळजबरीने त्यांच्याजवळील ८७० रुपये रोख हिसकावून तेथून पळ काढला.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. पुढील तपास सहायक फौजदार सुनील भानेगावकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The two arrested were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.