नागरी सेवा परीक्षेसाठी आता दोन अतिरिक्त संधी

By Admin | Updated: May 28, 2014 02:49 IST2014-05-28T02:49:31+5:302014-05-28T02:49:31+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेतल्या जात असलेल्या नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना यंदापासून २ अतिरिक्त संधी मिळणार आहेत़परीक्षा पद्धत किंवा अभ्यासक्रमात मात्र कुठलाही बदल झालेला नाही़

Two additional opportunities now for the Civil Services Examination | नागरी सेवा परीक्षेसाठी आता दोन अतिरिक्त संधी

नागरी सेवा परीक्षेसाठी आता दोन अतिरिक्त संधी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेतल्या जात असलेल्या नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना यंदापासून २ अतिरिक्त संधी मिळणार आहेत़परीक्षा पद्धत किंवा अभ्यासक्रमात मात्र कुठलाही बदल झालेला नाही़ युपीएससीने मंगळवारी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. सर्व श्रेणीतील उमेदवारांना दोन अतिरिक्त संधी देण्यासोबतच वयोमर्यादेत सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ २०१४ च्या परीक्षेपासून हा निर्णय लागू राहील. यापूर्वी नागरी सेवा परीक्षेसाठी कुठल्याही उमेदवाराला जास्तीत जास्त चार संधी उपलब्ध होत्या़ अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मात्र कुठलेही निर्बंध नव्हते़ या बदलासंदर्भातील अधिक माहिती ३१ मे रोजी प्रसिद्ध होणार्‍या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध केल्या जाईल, असे युपीएससीने म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Two additional opportunities now for the Civil Services Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.