शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालकांची चौकशी; पात्रांचे ट्वीट केले होते ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ टॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 05:46 IST

केंद्र सरकारने कोविड-१९ महामारीच्या केलेल्या हाताळणीवरून सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केले, असा आरोप संबित पात्रा यांनी ट्विटरवर केल्यापासून हा विषय सुरू झाला. नंतर ट्विटरने संबित पात्रा यांचे ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ म्हणून टॅग केले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ असे टॅग केल्यावरून दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना प्रश्न विचारले, असे सूत्रांनी सांगितले. या वर्षाच्या प्रारंभी दिल्ली पोलिसांनी ‘काँग्रेस टूलकिट’ म्हणून समोर आलेल्या प्रकरणात चौकशी सुरू केली होती.

केंद्र सरकारने कोविड-१९ महामारीच्या केलेल्या हाताळणीवरून सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केले, असा आरोप संबित पात्रा यांनी ट्विटरवर केल्यापासून हा विषय सुरू झाला. नंतर ट्विटरने संबित पात्रा यांचे ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ म्हणून टॅग केले.

दिल्ली पोलिसांची तुकडी गेल्या ३१ मे रोजी बंगळुरूला माहेश्वरी यांना या प्रकरणी प्रश्न विचारण्यासाठी गेली होती. दिल्ली पोलीस करीत असलेली चौकशी ट्विटर इंडियाचे अमेरिकास्थित मुख्य कंपनीशी (पॅरेंट कंपनी) असलेले संबंधच सिद्ध करीत नाही तर भारतीय कायदा राबवणाऱ्या यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी कंपनीच्या आडून गुप्तपणे चालणाऱ्या कारवायाही उघडकीस आणत आहे. काँग्रेसच्या कथित टूलकिटवर संबित पात्रा यांनी केलेले ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ असे का टॅग केले गेले, याचा तपशील मागणारी नोटीस दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला दिली होती. 

घटना, नियमांचे पालन करावे लागेल - प्रसादn    भारतीय कंपन्या व्यवसाय करतात, औषध कंपन्या अमेरिकेत जाऊन उत्पादन करतात तेव्हा अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करतात की नाही? तुम्हाला भारतात व्यवसाय करायचा आहे, पंतप्रधान आणि आम्हा सगळ्यांवर टीका करण्यासाठी तुमचे स्वागत आहे. परंतु, तुम्हाला भारताची घटना आणि नियमांचे पालन करावे लागेल, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले.

n    भारतात १०० कोटींपेक्षा जास्त लोक समाज माध्यमांना वापरतात. मला आनंद आहे. त्यांना पैसा कमवू द्या. युझर्सना आमच्यावर टीका करू द्या, त्यांचे खूप स्वागत आहे. परंतु, जेव्हा या नफा कमावणाऱ्या कंपन्या आम्हाला लोकशाहीबद्दल धडे देऊ लागतात तेव्हा मला प्रश्न विचारायला आवडेल, असे प्रसाद म्हणाले.

टॅग्स :Twitterट्विटर