पीटीआयचं ट्विटर अकाउंट हॅक
By Admin | Updated: February 1, 2017 23:52 IST2017-02-01T23:50:30+5:302017-02-01T23:52:25+5:30
इरानियन क्रॅक सिक्युरिटी नावाच्या ग्रुपकडून वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक

पीटीआयचं ट्विटर अकाउंट हॅक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. मात्र, काहीवेळातच ते पूर्ववत करण्यात आलं. जवळपास 20 मिनिटं पिटीआयचं अकाउंट हॅक झालं होतं.
बुधवारी इरानियन क्रॅक सिक्युरिटी नावाच्या ग्रुपने पीटीआयचं अकाउंट हॅक केलं होतं. हॅकर्सकडून पीटीआयच्या प्रोफाईलला असलेला फोटोही बदलण्यात आला होता.
संध्याकाळी 7.30 ते 7.50 पर्यंत ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं अशी माहिती पीटीआयने ट्विटरवर दिली. शिवाय यावेळात जे मेसेज पाठवण्यात आले असतील त्यासाठी पीटीआय जबाबदार नसल्याचंही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
Between 7:30 PM & 7.50 PM, PTI Twitter account was hacked. PTI is not responsible for any messages that could have appeared in that period.
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2017