शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:57 IST

'पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?'

ठळक मुद्देआयएसआय पुरस्कृत सायबर आर्मी ट्विटरवर खोट्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करून काश्मिरींना भडकवत आहे.#TwitterMustClarify या हॅशटॅगवरून तमाम देशप्रेमी नेटकऱ्यांनी ट्विटरवर निशाणा साधलाय.पाकधार्जिण्या सायबर आर्मीला ट्विटरवरून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था - आयएसआय पुरस्कृत सायबर आर्मी उघडपणे, ट्विटरसारख्या जबाबदार माध्यमावर खोट्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करून काश्मिरी जनतेला भारताविरोधात भडकवण्याचं काम करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कलम 370 मधील वादग्रस्त कलमं रद्द करण्याची आणि जम्मू-काश्मीरच्या विभाजनाची घोषणा झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. या गोंधळलेल्या जनतेचं शंकानिरसन करण्याची ग्वाहीही केंद्र सरकारने दिली आहे. पण त्याआधीच, भारतीयच काश्मिरींचे कसे शत्रू आहेत, असं भासवण्यासाठी काही पाकधार्जिण्या ट्विटर हँडलवरून रिपब्लिक वृत्तवाहिनीचे जुने व्हिडीओ छेडछाड करून पोस्ट केले जात आहेत. या धोकादायक प्रकाराची तात्काळ दखल घेत या इंग्रजी वृत्तवाहिनीने 'ट्विटर इंडिया'ला जाब विचारला आहे. #TwitterMustClarify या हॅशटॅगवरून तमाम देशप्रेमी नेटकऱ्यांनी ट्विटरवर निशाणा साधलाय असून पाकधार्जिण्या सायबर आर्मीला ट्विटरवरून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.

जम्मू-काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा हटवण्यात आल्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत केली. अनेक वर्षं चर्चेत असलेल्या कलम ३७० मधील वादग्रस्त तरतुदी रद्द करण्यात आल्या आणि जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचं विधेयकही संसदेत मंजूर झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ७ ऑगस्टला 'with kashmir' या हँडलवरून इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करण्यात आली. ही स्टोरी ट्विटमध्येही होती. 'Now Operation Elimination starts. We will have to eliminate these people. As a proud Indian, I am prepared for collateral damage', असं अर्णब गोस्वामी आपल्या डिबेट शोमध्ये बोलत असल्याचा व्हिडीओ दाखवण्यात येत होता. 'आता ह्यांना संपवण्याची धडक कारवाई सुरू व्हायला हवी, त्यात आपलं काही नुकसान झालं तरी बेहत्तर', अशा आशयाचं हे विधान काश्मिरींबाबत आहे आणि हीच भारतीयांच्या मनातील सूप्त इच्छा आहे, असं भासवून काश्मिरींची सहानुभूती मिळवण्याचं हे कारस्थान होतं. मुळात, हा व्हिडीओ ३७० कलम हटवल्यानंतरचा नव्हताच आणि त्यातलं शेवटचं वाक्य हटवून अर्थाचा अनर्थ करण्याची खेळी देशविरोधी गटांनी केली होती. 

वास्तविक, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर वृत्तवाहिनीवर २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेचा हा व्हिडीओ आहे. त्यात अर्णब यांनी स्पष्ट म्हटलंय की, दगडफेक करणारी गँग, फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पावलं उचलायला हवीत. परंतु, तेच पाकधार्जिण्यांनी वगळलं आणि काश्मिरी जनतेला चिथावण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या अपप्रचाराविरोधात #TwitterMustClarify हा हॅशटॅग तयार करून रिपब्लिक वाहिनी आणि देशप्रेमी नेटकऱ्यांनी ट्विटरला घेरलं. 

भारताविरोधात गरळ ओळणाऱ्या, पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या, आयएसआय पुरस्कृत सायबर आर्मीच्या ट्विटर हँडल हटवली का जात नाहीत, ट्विटर त्यांना पाठीशी घालतंय का?, या पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?, असा प्रश्नांचा भडिमार नेटकऱ्यांनी केला आहे. त्यांना ट्विटर इंडियाकडून ठोस उत्तर हवंय, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही काही जणांनी दिला आहे.    

या चर्चेदरम्यान @ZaidZamanHamid हे ट्विटर हँडल चर्चेत आलं आहे. हा माणूस आयएसआयचाच हस्तक असून तो काश्मिरी जनतेमध्ये भारताबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जातोय. त्याची काही ट्विट पाहिली तर त्यातून त्याच्या भारतद्वेषाची कल्पना येऊ शकते. अशा माणसाचं अकाउंट ट्विटर व्हेरिफाईड (नावापुढे ब्लू टिक)असूच कसं शकतं?, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय.

एवढं सगळं होत असतानाही, ट्विटर इंडियाने चकार शब्द काढलेला नाही. एक जबाबदार समाजमाध्यम म्हणून अशा पद्धतीच्या समाजविघातक तत्त्वांना त्यांनी अजिबात थारा देता कामा नये. ही माणसं फेक फोटो, व्हिडीओ पसरवून देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवत आहेत. त्यामुळे भारतीय नेटिझन्समध्ये तीव्र नाराजी, संताप आहे. फेसबुकने अशी अनेक अकाउंट्स, फेक अकाउंट्स बंद केली आहेत. खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीही ते अनेक उपाययोजना करताना दिसताहेत. ट्विटरनेही जनभावनांची दखल न घेतल्यास नेटकरी त्यांना 'जोर का झटका' देऊ शकतात. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एTwitterट्विटरAmit Shahअमित शहा