ट्विटर शब्दमर्यादा होणार १० हजार
By Admin | Updated: May 18, 2016 04:24 IST2016-05-18T04:24:03+5:302016-05-18T04:24:03+5:30
ट्विटरवर आपल्या भावना केवळ १४० शब्दांमध्येच व्यक्त करता येतात

ट्विटर शब्दमर्यादा होणार १० हजार
नवी दिल्ली : ट्विटरवर आपल्या भावना केवळ १४० शब्दांमध्येच व्यक्त करता येतात. अनेकांना त्यामुळे आपले म्हणणे नीट मांडता येत नाही वा तितक्या शब्दांत मांडले तरी ते अनेकांना समजतच नाही. त्यामुळे ही शब्दमर्यादा वाढवावी, अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त केली जात होती. त्याची दखल घेत, ट्विटरने आता शब्दमर्यादा वाढवायचे ठरवले आहे. त्यामुळे १४० शब्दांची मर्यादा १० हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.