शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरला नवीन आयटी नियमांचे पालन करावे लागेल; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:53 IST

केंद्र सरकारला नोटीस बजावत बाजू मांडण्याचे निर्देश

नवी दिल्ली : डिजिटल मीडियासंदर्भात नवीन आयटी नियमांना स्थगिती देण्यात आलेली नसेल, तर या नियमांचे ट्विटरला पालन करावेच लागेल, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावत बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आणि केंद्र सरकार दरम्यान नवीन माहिती व तंत्रज्ञान कायदा, २०२१ यामुळे निर्माण झालेला तणाव आणखी वाढला आहे. नवीन कायद्यात समाज माध्यमांवर अंकुश ठेवण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयात न्या. रेखा पल्ली यांनी या विषयावर केंद्र सरकार आणि ट्विटरला निर्देश दिलेत. आम्ही केंद्र सरकारने आखून दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करीत आहोत, असा खुलासा ट्विटरकडून उच्च न्यायालयात करण्यात आला. यावर केंद्र सरकारने ट्विटरवर आक्षेप घेत त्यांच्याकडून कायद्याचे पालन होत नसल्याकडे लक्ष वेधले. दिनांक २८ मेपासून भारतात निवासी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी स्थानिक तक्रारींच्या निराकरणाच्या जबाबदारीचे वहन करेल; असे ट्विटरकडून सांगण्यात आले असले तरी संबंधित अधिकाऱ्याचे नाव ट्विटरकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. 

टॅग्स :Twitterट्विटर