दुहेरी हत्याकांडाचे धागेदोरे सापडले चौकशी : नाशिकमधून काही जण ताब्यात
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30
संगमनेर : बोटा शिवारात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून नाशिक येथून मयतांच्या नातेवाईकांसह काही जणांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता बळावली आहे.

दुहेरी हत्याकांडाचे धागेदोरे सापडले चौकशी : नाशिकमधून काही जण ताब्यात
स गमनेर : बोटा शिवारात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून नाशिक येथून मयतांच्या नातेवाईकांसह काही जणांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता बळावली आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोटा शिवारातील कच नदी परिसरात सरपंच विकास शेळके यांच्या पडीक शेत जमिनीत अनोळखी तरुण-तरुणीचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी पेट्रोलचा वास येत असलेल्या दोन रिकाम्या प्लॅस्टीकच्या बाटल्या, नायलॉन दोरी व चपला सापडल्या. मात्र हा घातपात की आत्महत्या? याचा उलगडा होत नसल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. घटनास्थळाचा पंचनामा होवून दोन्ही मृतदेहांची प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. तपासणी दरम्यान मयत तरुण-तरुणीचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून मृतदेह जाळल्याचे समोर आले. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अनिल नलावडे व उपनिरीक्षक मुख्तार शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस पथके पुणे व मुंबईला रवाना झाली. तपास सुरू असताना शुक्रवारी संबंधीत मयत तरुण मुंबई तर तरुणी नाशिकची असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यावरून पोलिसांनी नाशिकला जावून संबंधीतांच्या नातेवाईकांसह काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना संमनेरात आणून शनिवारी दिवसभर तालुका पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. दोन्ही मयत तरुण-तरुणी नाशिकच्या प्रतिथयश सैनिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असल्याचे समजते. (प्रतिनिधी) ---------दुहेरी हत्याकांडाचा छडा लागणारपोलिसांची झोप उडवून टाकणार्या बोटा परिसरातील दुहेरी हत्याकांडाचा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नलावडे, उपनिरीक्षक मुख्तार शेख, पोलीस नाईक बन्सी टोपले, तुकाराम तुपे, समाधान पाटील, वाय. एल. शेख, हासे आदी तपास करीत आहेत. सदर गुन्ह्याचा माग काढताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, असा पोलिसांना विश्वास आहे.