डुकराच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:06+5:302014-12-20T22:28:06+5:30
लोहगड: रानडुकराने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून पडल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या धाबा गावानजीक १८ डिसेंबर रोजी घडली. धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसचे चालक असलेले मिर्झापूर येथील भगवानराव जाधव हे गुरुवार, १८ डिसेंबर रोजी नियमितपणे शाळेत जाण्यासाठी पहाटेच दुचाकीने निघाले. वाटेत साडेपाच वाजताच्या दरम्यान अचानक समोर आलेल्या डुकराने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)

डुकराच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
ल हगड: रानडुकराने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून पडल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या धाबा गावानजीक १८ डिसेंबर रोजी घडली. धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसचे चालक असलेले मिर्झापूर येथील भगवानराव जाधव हे गुरुवार, १८ डिसेंबर रोजी नियमितपणे शाळेत जाण्यासाठी पहाटेच दुचाकीने निघाले. वाटेत साडेपाच वाजताच्या दरम्यान अचानक समोर आलेल्या डुकराने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)