मुंबईसाठी एकाच रात्री जाणार बाराशे बसगाड्या आरटीओचा एस्कॉर्ट : सर्व अवजड वाहतूक थांबविणार
By Admin | Updated: August 25, 2015 22:46 IST2015-08-25T22:46:51+5:302015-08-25T22:46:51+5:30
नाशिक : कुंभमेळ्याच्या दरम्यान, मुंबईहून कोकणला जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिल्याने दुसरी पर्वणी संपल्यानंतर लगेचच रात्री १२०० बस तातडीने एका रांगेत मुंबईला रवाना होणार आहे. कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक रस्त्यात येऊ न देता खास आरटीओच्या एस्कॉर्टमधून या बस मुंबईला रवाना होतील.

मुंबईसाठी एकाच रात्री जाणार बाराशे बसगाड्या आरटीओचा एस्कॉर्ट : सर्व अवजड वाहतूक थांबविणार
न शिक : कुंभमेळ्याच्या दरम्यान, मुंबईहून कोकणला जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिल्याने दुसरी पर्वणी संपल्यानंतर लगेचच रात्री १२०० बस तातडीने एका रांगेत मुंबईला रवाना होणार आहे. कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक रस्त्यात येऊ न देता खास आरटीओच्या एस्कॉर्टमधून या बस मुंबईला रवाना होतील.कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमाने मुंबईतून दरवर्षी जातात. यंदा दरवर्षीप्रमाणे कोकणात जाण्यासाठी १९०० बसगाड्यांचे आरक्षण होईल इतकी तिकीट नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, मुंबईमध्ये केवळ सातशे बस उपलब्ध आहेत. अन्य डेपोंमधील २२०० बस नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी असल्याने आता या बसपैकी १२०० बसगाड्या मुंबईला कोकण दौर्यासाठी नेण्यात येणार आहे. १३ तारखेची पर्वणी झाल्यानंतर १४ तारखेला रात्री या बाराशे गाड्या मुंबईकडे रवाना होतील. विशेष म्हणजे आरटीओच्या एस्कॉर्टच्या माध्यमातून रात्री या गाड्या नेल्या जाणार असून, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णत: थांबविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.