शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Inflation: बारावा महिना महागाईचा! टीव्ही पाहणे, मोबाइलवर बोलणे झाले महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 06:41 IST

Inflation: गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबरोबरच महागाईलाही सामोरे जात असलेल्या सामान्यांना वर्षाच्या अखेरच्या महिन्यातही महागाईपासून सुटकारा मिळालेला नाही.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबरोबरच महागाईलाही सामोरे जात असलेल्या सामान्यांना वर्षाच्या अखेरच्या महिन्यातही महागाईपासून सुटकारा मिळालेला नाही. उलटपक्षी रोजच्या वापरातील टीव्ही आणि मोबाइल या वस्तूंचा वापरही आता १ डिसेंबरपासून महाग झाला आहे. एवढेच नव्हे तर आगपेटीची किंमतही दुपटीने वाढली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी वाढली असली तरी घरगुती सिलिंडरची किंमत ‘जैसे थे’ ठेवली आहे, हीच सामान्यांसाठी समाधानाची बाब आहे. 

रिचार्ज प्लान मोबाइल सेवा पुरवणाऱ्या एअरटेल, व्होडाफोन व जिओ या कंपन्यांनी रिचार्ज प्लान महाग केले आहेत. सामान्यांना इंटरनेट तसेच टॉक टाइम रिचार्ज करताना वाढलेल्या दरांचा फटका बसेल. 

डीटीएच सेवा१ डिसेंबरपासून डीटीएच रिचार्ज ३५ ते ५० टक्क्यांनी महाग झाले. स्टार प्लस, कलर्स, सोनी व झी या वाहिन्या पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

क्रेडिट कार्ड व्यवहार- एसबीआय क्रेडिट कार्डावर केलेल्या खरेदीच्या मासिक हप्त्याच्या व्यवहारावर ग्राहकांना ९९ रुपयांचे प्रक्रिया शुल्क व त्यावरील कर द्यावा लागेल. - ही घोषणा केली असून हा निर्णय १ डिसेंबरपासून अमलात आणला जाणार आहे.  

आगपेटी ‘भडकली’आगपेटीची किंमत १ डिसेंबरपासून वाढून दुप्पट झाली. आगपेटीसाठी एक रुपयाऐवजी दोन रुपये द्यावे लागतील. १४ वर्षांत पहिल्यांदाच ही वाढ झाली. २००७ मध्ये आगपेटीची किंमत ५० पैशांवरून एक रुपया झाली होती.

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारतbusinessव्यवसाय