टीव्ही अँकरची आत्महत्या
By Admin | Updated: March 16, 2016 12:03 IST2016-03-16T11:58:17+5:302016-03-16T12:03:35+5:30
जेमिनी म्युझिक या तेलगु संगीत वाहिनीची महिला निवेदीका के.निरोशाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टीव्ही अँकरची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १६ - जेमिनी म्युझिक या तेलगु संगीत वाहिनीची महिला निवेदीका के.निरोशाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निरोशा २३ वर्षांची होती. बुधवारी सकाळी सिकंदराबाद येथील पीजी हॉस्टेलच्या रुममध्ये निरोशा मृतावस्थेत आढळली.
तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेलगु न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार म्युझिक चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करण्यापूर्वी निरोशाने पत्रकार म्हणून काम केले होते. आत्महत्या करण्याच्या काही मिनिटं आधी तिने फोन केला होता असे पोलिसांनी सांगितले.
प्रेम प्रकरणातील नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. निरोशाचा प्रियकर रितविक कॅनडामध्ये रहातो. तिचे पालक चित्तूर जिल्ह्यातील सोमाला मंडलमध्ये रहतात. पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.