क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30

क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा
>जळगाव : शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतूक प्रश्नी तेथे क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा अन्यथा एस.टी. बसला विशेष बाब म्हणून येथून वाहतूक करू द्यावी, असे एस.टी. महामंडळाने मनपाला कळविले आहे. शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतूक प्रश्नी तेथे क्रॉसबार लावण्यासाठी मनपाने एस.टी. महामंडळाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. त्यावर उत्तर देताना एस.टी. महामंडळाने म्हटले आहे की, येथे बॅरिकेटस् लावल्याने अवजड वाहनांसह एस.टी.च्या बसेसही या मार्गावरुन बंद होतील व अवैध वाहतुकीला चालनाच मिळेल. त्यामुळे एकतर विशेष बाब म्हणून येथून एस.टी.ला येथून जावू द्यावे अन्यथा सरसकट वाहतूक बंद करावी, असे एस.टी.ने मनपाला कळविले आहे.