हळद जाणार इंग्लंडला - जोड बातमी
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30
बॉक्स

हळद जाणार इंग्लंडला - जोड बातमी
ब क्स- नद्यांचे जलपूजन पातूर तालुक्यातील शेतकर्यांनी जिद्द, चिकाटीने शेती फुलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या तालुक्यात ८० टक्के क्षेत्रावर सिंचन केले जाते. तथापि, यावर्षी पाऊस कमी झाल्याने या तालुक्यातही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी येथील शेतकर्यांनी आहे त्या पाण्याचे काटेकोर नियोजन केले आहे. कृ तज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील शेतकर्यांनी नद्यांच्या पाण्याचे जलपूजन केले आहे.बॉक्स -हेक्टरी अडीचशे क्िंवटल उत्पादन ओल्या हळदीचे उत्पादन हेक्टरी २५० क्िंवटल असून, वाळलेल्या हळदीचे हेक्टरी ६० क्विंटल उत्पादन मिळते. या हळदीचे भाव राज्यातील बाजारपेठेत प्रतिक्िंवटल सहा हजार ते सहा हजार पाचशेपर्यंत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनी एकाच वेळी पाचशे टन हळद खरेदी करणार आहे. कोट---पातूर तालुक्यातील हळदीमध्ये कुरकमीनचे प्रमाण अधिक असल्याने इंग्लंडच्या एका कंपनीने पाचशेे टन हळद मागितली आहे. त्यासाठीचा करार सुरू आहे.- दादाराव देशमुख (कृषिभूषण),अध्यक्ष - श्रमिक भारती ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी,पातूर, जि. अकोला .