...तर बोगदा खुला होणार!

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30

इंदिरानगर : उड्डाणपुलाचा बोगदा (अंडरपास) वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत आपली पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून, सध्या सुरू असलेल्या वाहनचालकांच्या सर्वेक्षणात ४० टक्के नागरिकांनी जरी विरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या, तरी बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची ग्वाही आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

The tunnel will be open! | ...तर बोगदा खुला होणार!

...तर बोगदा खुला होणार!

दिरानगर : उड्डाणपुलाचा बोगदा (अंडरपास) वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत आपली पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून, सध्या सुरू असलेल्या वाहनचालकांच्या सर्वेक्षणात ४० टक्के नागरिकांनी जरी विरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या, तरी बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची ग्वाही आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.
येथील बजरंग कॉलनीतील समाजमंदिराच्या भूमिपूजनासाठी प्रा. फरांदे आल्या असता, त्या बोलत होत्या. सदर बोगद्यातून होणार्‍या वाहतुकीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातून निष्कर्ष काढून मगच कार्यवाहीचा निर्णय घेतला जाणार होता; मात्र आपण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी रवाना होताच घाईघाईने पोलिसांनी सदर बोगदा बंद केला, असा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यावरून आता राजकारण केले जात आहे. मात्र या उड्डाणपुलात अनेक त्रुटी असताना, तो उभारला जाताना असे राजकारण का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. उड्डाणपुलावर याच ठिकाणी चढण्यास व उतरण्यास मार्ग ठेवण्याची काहीएक गरज नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तथापि, याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. सर्वेक्षणाचा कल बोगदा बंद करण्याच्या विरोधात आढळून आल्यास बोगदा तातडीने खुला केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. नागरिकांची सोय लक्षात घेऊन लवकरच कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.

या बातमीशेजारी याच विषयाची आणखी एक बातमी लावावी.

Web Title: The tunnel will be open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.