हणखणे हायस्कूलतर्फे क्षयरोग निर्मुलन फेरी

By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:59+5:302015-04-10T23:29:59+5:30

हणखणे : जागतिक क्षयरोग निर्मुलन दिनाचे औचित्य साधून हणखणे येथील सरकारी हायस्कूल व कासारवर्णे आरोग्य केंद्राच्या सहकार्याने क्षयरोग निर्मुलन जागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले होते. यानिमित्त संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात कासारवर्णे आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक संतोष शेटकर व डॉक्टर श्वेतलाना कांबळी यांनी क्षयरोगासंबंधी तपशीलवार माहिती देऊन तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी यासंबंधी विवेचन केले. प्रारंभी राजन केसरकर यांनी स्वागत केल्यावर मुख्याध्यापक दादू परब यांनी प्रास्ताविक केले. रामा बिचोलकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन केसरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सत्यवान केणी, बार्बरा कुटो व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक

Tuberculosis erosion round by Hanikhane High School | हणखणे हायस्कूलतर्फे क्षयरोग निर्मुलन फेरी

हणखणे हायस्कूलतर्फे क्षयरोग निर्मुलन फेरी

खणे : जागतिक क्षयरोग निर्मुलन दिनाचे औचित्य साधून हणखणे येथील सरकारी हायस्कूल व कासारवर्णे आरोग्य केंद्राच्या सहकार्याने क्षयरोग निर्मुलन जागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले होते. यानिमित्त संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात कासारवर्णे आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक संतोष शेटकर व डॉक्टर श्वेतलाना कांबळी यांनी क्षयरोगासंबंधी तपशीलवार माहिती देऊन तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी यासंबंधी विवेचन केले. प्रारंभी राजन केसरकर यांनी स्वागत केल्यावर मुख्याध्यापक दादू परब यांनी प्रास्ताविक केले. रामा बिचोलकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन केसरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सत्यवान केणी, बार्बरा कुटो व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक बाबू नाईक व इतरांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) फोटो : क्षयरोग जागृती फेरीस प्रारंभ करताना दादू परब, संतोष शेटकर, डॉ. कांबळी व इतर. (महादेव च्यारी) १००४-एमएपी-०२

Web Title: Tuberculosis erosion round by Hanikhane High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.