कारागृहातून न्यूयॉर्क हॉटेल विकण्याचे प्रयत्न

By Admin | Updated: August 11, 2014 01:17 IST2014-08-11T01:17:38+5:302014-08-11T01:17:38+5:30

सहारा प्रमुख सुब्रतो राय तिहार कारागृहातून आपले न्यूयॉर्क प्लाझा आणि लंडन्स ग्रोसवेनर हाऊस हॉटेल विकण्याचे प्रयत्न करणार आहेत

Trying to sell New York hotel from prison | कारागृहातून न्यूयॉर्क हॉटेल विकण्याचे प्रयत्न

कारागृहातून न्यूयॉर्क हॉटेल विकण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली : सहारा प्रमुख सुब्रतो राय तिहार कारागृहातून आपले न्यूयॉर्क प्लाझा आणि लंडन्स ग्रोसवेनर हाऊस हॉटेल विकण्याचे प्रयत्न करणार आहेत.
रॉय न्यूयॉर्क हॉटेल आणि आणखी दोन मालमत्ता विक्रीला काढणार आहेत. जामिनासाठी त्यांना १.६ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. एवढी रक्कम उभी करू शकल्यावर ते तिहार कारागृहातून बाहेर येऊ शकतील.
या मालमत्तेच्या विक्रीसाठी रॉय यांना तिहार तुरुंगात एक कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. ६०० चौरस फूट कार्यालयात ते व्हिडिओ कॉन्फरन्स आणि अभ्यागतांची भेट घेऊ शकतील आणि हॉटेलची विक्री किंवा गहाण ठेवण्याचे प्रयत्न करतील.
या कार्यालयाला लागून एक लहान खोली आहे. तेथे तीन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी राय आणि त्याचे तुरुंगवास भोगत असलेले अन्य दोन साथीदार राहतील.
राय आत असल्याने या कार्यालयात कुणालाही प्रवेश शक्य नाही. विनापरवानगी कैद्यांशी संपर्क करण्यास प्रतिबंध आहेत. तीन सुरक्षा रक्षक राय यांच्यावर पाळत ठेवणार आहेत. एक इमारतीच्या छतावर आणि दोन खाली गस्त घालणार आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Trying to sell New York hotel from prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.